पहुर ;– जामनेर तालुक्यातील पहुर पेठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घोलप यांच्या शेतात नांदगाव जिल्हा नाशिक येथील धनगर बांधव शेतात आल्या असता देशभरात असलेल्या लॉक डॉन मुळे या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली होती येथील शेतकरी ज्ञानेश्वर घोलप यांनी जामनेर शिवसेना शहर प्रमुख पवन माळी यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबांना किराणा अन्नधान्याची देण्याची मागणी केली घोलप यांच्या तात्काळ हाकेला ओ देऊन शिवसेना जामनेर शहर प्रमुख पवन माळी यांनी ताबडतोब पोहोचला या सर्व धनगर कुटुंबीयांना किराणा कीट देऊन सहकार्याची भावना त्यांनी जोपासली पवन माळी यांच्यासोबत शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे संघटक संजय तायडे ज्ञानेश्वर घोलप पिराजी शिंगाडे भगवान कोळेकर यांच्यासह धनगर बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते