पारोळा ;- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील म्हसवे शिवारात मागून येणाऱ्या गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने त्या छोटूलाल कृष्णा पाटील हे गंभीर जखमी झाले.छोटू पाटील हे सांगवी विटनेर भागात वायरमन असून ते आपल्या मोटार सायकलने पारोळा हुन सांगवी कडे जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागाहुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले .
कुटीर रुग्णालयातील डॉक्टर निखिल बोरा आणि कर्मचारी यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.