जळगाव ;– सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असल्याने दुसरीकडे मात्र विविध दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठीचा रक्तसाठा कमी पडत असून यासाठी राष्ट्रवादी महानगरतर्फे २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, आकाशवाणी चौक, जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . रक्तदान शिबिरात रक्तदानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अभिषेक शांताराम पाटील , सचिव अँड कुणाल पवार , जिल्हा अध्यक्ष युवक स्वप्नील नेमाडे आदींनी केले आहे .