नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांना उपचाराकरितापैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडत आहे. हॉस्पिटल दिवसाला 8 ते 10 हजार रुपये आकारत आहेत. अशावेळी जर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे म्हटले तर जवळपास दीड ते दोन लाख रुपये एकाला खर्च येत आहे. न होवो, परंतू घरातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना हॉस्पिटलाईज कराय़ची वेळ आली तर हा खर्च कसा उभारायचा असा प्रश्न आहे. यासाठी सरकारी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुम्हाला कोरोना उपचारासाठी 5 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन देत आहेत.कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यामुळे अनेकांना हॉस्पिटल ऑक्सिजन बेड, आयसीयुची गरज लागली आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशनने एका संयुक्तीक पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे.








