जळगाव – जळगाव येथील जिल्हा कारागृहातून आज सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जिल्हा कारागृहात आज सकाळी तीन कैद्यांनी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाडफअमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. गेल्या दोन महिन्यात ही दुसरी घटना आहे.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास या तिन्ही कैद्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने त्यांचा तपास सुरू केला आहे. तीन कैदी फरार झाल्याची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलम रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापूराव रोहम, तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले







