ब्राझिल ;- एड्ससारख्या आजाराचं नाव काढलं तरी कित्येकांच्या छातीत धडकी भरते. या दुर्धर आजारावर आजतागायत प्रभावी असं औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र आता हा आजार कायमचा बरा करणारं औषध तयार असल्याचा दावा काही संशोधकांनी केला आहे. या औषधाची माहिती लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणार असल्याचंही संशोधकांनी म्हटलं आहे.
ब्राझीलमधील संशोधकांनी नुकतचं याबाबत संशोधनकार्य हाती घेतलं. एका रुग्णावर आता यशस्वी उपचार करण्यात आले असून, तो एड्समुक्त झाला असल्याचा दावाही फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांनी केला आहे.
अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटीनामाइड औषधांचं मिश्रण करुन हे नवीन औषध तयार करण्यात आलं आहे.







