जळगाव ;-कोरोना महामारी मुळे जगभरातील व्यवहार ठप्प झाले असून याचा खाजगी शिक्षकांना देखील मोठा फटका बसला आहे,मात्र ७० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत असल्याची माहिती बियुएन रायसोनी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी केसरीराजशी बोलताना दिली . ते म्हणाले कि १५ जूनपासून ऑनलाईन शिक्षण शाळे कडून दिले जात असून दररोज शिक्षक ऑनलाईन शिकवीत आहे . सध्या शाळेत ७० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपल्बध करून दिले जात आहे . शाळा जरी बंद असली तरी आषाढी एकादशीनिमित्त गीत गायन स्पर्धेत इयत्ता ७ विच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता . तसेच इतर कार्यक्रम देखील शाळेकडून नेहमीप्रमाणे राबविले जात असल्याची माहिती चंद्रशेखर पाटील यांनी बोलताना दिली .
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि , कोरोना महामारी मुळे शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वीकारली आहे, शिक्षण संस्थांकडून शासनाच्या आदेशा नुसार ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे . परंतु त्यांनी पालकांना विनंती केली आहे कि शाळेची फी पालकांनी वेळेवर भरली तर शाळेचा कारभार चालवणे सोयीचे होईल. परंतु काही पालक हे शाळेची फी भरत नसल्यामुळे खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षकांवर दुसरीकडे रोजंदारी ने काम करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे शासनानेही शिक्षकांचे हित लक्षात घेऊन धोरण ठरविण्याची गरज असून पालकांनी आपल्याच्या शाळेची फी वेळेवर भरून शिक्षकांना उपासमारीपासून वाचवावे अशी मागणी खासगी संस्थांमधील शिक्षकांकडून होत आहे,







