कोरोना निदान चाचण्या !

जळगाव ;-मोठया शहरांमध्ये सध्यस्थतीत मोठ्या शल्यक्रियेपूर्वी त्या रुग्णास कोरोना आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी व त्याप्रमाणे शल्यक्रिया करायची का नाही ह्याचा निर्णय व शल्यक्रियेचीं निकड किती आहे ह्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी CTSCAN cheast च्या अहवालाची मदत घेतली जात आहे ! जेव्हा आपण कोरोनाच्या लक्षणे व निदान चाचण्यांवर जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उपचाराबद्दल हि जागरूक राहिले पाहिजे असा सल्ल्ला प्रसिद्ध भूल तज्ञ डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिला आहे.

त्यांनी सांगितले कि , दुर्देवाने आम्ही भारतीय लोक उत्साहाच्या भरात कोरोनील ( आयुर्वेदिक ) , अर्सेनिक अल्बम ( होमीओपॅथ ) व फ्लॅबिफ्लू , हायड्रोक्सक्लोरॉकीन ( ऍलोपॅथ ) ह्या ओषधी व गोळ्यांची जाहिरात मोठ्या व अतिरेकी प्रमाणात करत आहोत .
जेव्हा की कोरोना ह्या विषाणू संक्रमणाविरोधी कुठलीही लस व कुठलीही ओषधीं आज बाजारात उपलब्ध नाही आहे .
वरील जी ओषधी आज कोरोनाच्या आजारात वापरली जात असली किंवा असा दावा
जरीअनेक लोकांकडून केला जात असेल तरी गुणकारकता व उपयुक्तता अजून सिद्ध झालेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे .
त्यामुळे सध्यातरी आपण सर्व नागरिकांनी स्वयं शिस्त पाळून शारीरिक अंतर पाळणे , मास्क चा वापर करणे , वारंवार हात धुणे , व सर्दी खोकला व इतर लक्षणे जाणवल्यास विलगीकरण करून लगेच नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधला पाहिजे असे आवाहनही डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी केले आहे. व स्वतः ची कोरोनाविषयी काळजी घेत असतांना ओषधी व गोळ्यांची अतिरेकी मार्केटिंग न करता कोरोनाच्या प्रतिबंधनात्मक सवयी , आणि प्राथमिक स्वरूपातच कोरोनाला अटकाव करण्यासाठी लागणाऱ्या निदान चाचण्याना लवकरात लवकर सामोरे जाण्याबाबत इतर नागरिकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे तरच आपण कोरोनाशी लढू शकू !

डॉ . नरेंद्र ठाकूर
सुखकर्ता फाऊन्डेशन , एरंडोल







