मुंबई : कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरच मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या ९९ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तर १ हजार ३०९ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के असल्याने आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५८६ प्रॅक्टिशनर डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर, १०० हाऊस सर्जन आहेत. यातील ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.







