काय सुरु राहणार काय बंद राहणार जाणून घेऊ नियम
जळगाव ;- जळगाव जिल्ह्यात उद्या ७ सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक जाहीर करण्यात आला असून शासन नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियमावली जाहीर केली असून याचे काटोकोर पालन होणे आवश्यक आहे.
खालील प्रकारे अनलॉक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहणार आहे.
१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील.
२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील
३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील
४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग :पूर्ववत सुरू करण्यात येतील.
५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.
६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील
७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.
८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.
९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.
१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी
११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी
१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत
१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.
१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू
१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू
१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग जास्त तेथे जाण्यासाठी वा तेथून येण्यासाठी ई-पास आवश्यक
१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार
१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही.