अमळनेर;- जळगाव येथून बालिका आणि बालक यांचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही बालकांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले आहे.
जळगावातील गोपाळपुरा भागात मूळचे शेलजा (ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असणारे चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहेत. यात राजू दत्तू चव्हाण हे पत्नी राणी व मुले काजल, नंदिनी व प्रवीण हे येथे राहतात . २७ मे रोजी दुपारी आरोपी सुनील बारेला याने चिकन घेण्याच्या बहाण्याने काजल राजू चव्हाण (वय १०) व मयूर रवींद्र बुनकर (वय ९) या दोन बालकांना घेऊन गेला. यामुळे राणी चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सुनिल पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी अपहरण करणार्याचा तपास सुरू केला होता. अमळनेर शहरात सुरेश पापाजी दाभोडी यांना अपहरण करणारा सुनील बारेला हा दोन बालकांसह फिरतांना दिसला. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून अपहरण कर्त्याला अटक केली. यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हनुमान भक्त सुरेश पापाजी दाभोडी यांचा सत्कार केला.
मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने सुरेश दाभाडे यांनी केलेल्या कार्याचा याप्रसंगी गौरव करत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन या प्रसंगी गौरव करण्यात आला. यावेळी समाजाचे प्रदेश महामंत्री व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे दिलीप चांगरे, सुनील पवार ,संजय संकत, रामजी पवार ,सूरज पवार, रोहित पवार, मोहन करोसिया, प्रकाश संकत, घनशायम चावरीय, विक्रम सारवान आदींच्या उपस्थितीत यावेळी गौरव करण्यात आला.