मुंबई (वृत्तसंस्था ) ;- 2019 च्या शेवटात कोरोना काळाला सुरूवात झाली. चीनमध्ये उगम झालेला हा रोग हळूहळू इतर देशात आगीसारखा पसरू लागला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाने चहुबाजूनं घेरलं. जगातील सर्वात मोठी आणि चांगली आरोग्य यंत्रणा असताना देखील अमेरिका कोरोना समोर निष्फळ ठरली. त्यानंतर जगभरात लसीकरणावर काम करण्यात आलं. फायझरने लस तयार करण्यात तत्परता दाखवली आणि अखेर त्यांनी लस तयार केली. त्यावर नंतर 3 टप्प्यात चाचण्या झाल्या. यातच मानवी चाचणी दरम्यान लसीचा पहिला डोस दिला गेलेल्या व्यक्तीचा नुकताच मृत्यु झाला आहे. कोरोनाची सर्वांत पहिली लस घेणाऱ्यांपैकी असणाऱ्या विल्यम शेक्सपिअर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विल्यम शेक्सपिअर यांनी 8 डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. लस घेतली तेव्हा त्याचं वय 81 वर्ष होतं. फायझर-बायोएनटेकच्या मानवी चाचणी दरम्यान त्यांना लस दिली गेली होती. त्यांनी ज्या रूग्णालयात लस घेतली होती, त्याच रूग्णालयात त्यांचा मृत्यु झाला आहे. मात्र त्यांचा मृत्यु कोरोनाने व होता, त्यांना आधीच ग्रासलेल्या आजाराने झाला आहे.
इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस देण्यात आला होता. डोस देण्याच्या वेळी त्यांचं वय 90 वर्ष होतं. विल्यम शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते. त्यांच्या मृत्युची माहिती स्थानिक वृत्तपत्रानं दिली आहे.
दरम्यान, अनेक गोष्टींसाठी विल्यम शेक्सपिअर कायम आठवणीत राहील. सर्वात आधी लस घेण्यानं तो लोकांच्या स्मरणात आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चं लसीकरण करुन घेणं, अशी प्रतिक्रिया विल्यम शेक्सपियर यांच्या मित्राने दिली आहे.