मुंबई: भाजपाच्या वेबासाईटवर एक मोठी झाली असून यात रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा या वेबसाईटवरआक्षेपार्ह उल्लेख केलेला आढळून आला असून यामुळे खळबळ उडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र हा सर्व गोंधळ गुगल भाषांतरामुळे निर्माण झाल्याची माहिती येत आहे . तसेच याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी माहिती खा. रक्षाताई खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली . तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अशा व्यक्तींना शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असा इशारा अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे.
गुगल भाषांतरामुळे गोंधळ!
प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, रावेर (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे.







