पाचोरा – कोरोनाच्या पार्शवभूमीवर केंद्र राज्य सरकार ने वारंवार सूचना करून देखील खाजगी फायन्सास कंपन्यांकडून कर्जदारांना एजेंट द्वारा फोन लावून व प्रत्यक्ष घरी जाऊन धमकावण्याचे काम सुरु आहे.त्यामुळे सक्ती करू नये अन्यथा सेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
जगभरामध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातलेले असताना केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी सूचना देऊन लोकडाऊनचा कालावधी वाढुवुन या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. टाळेबंदी, व लॉकडाऊन मुळे, हाताला रोजगार नसल्यामुळे तसेच सर्व कंपन्या व काम धंदे बंद असल्यामुळे कर्जदारांना उपासमारीची वेळ आलेली असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खाजगी फायनान्स कंपन्यांना दिवाळी पर्यंत कोणत्याही कर्जदाराकडून सक्तीने वसुली करू नये, असे सूचित केलेले आहे.
शहरात व ग्रामीण भागात दहा ते पंधरा खासगी फायन्सास कंपन्या कार्यरत असून, त्या एजन्ट द्वारे कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी फोन द्वारे धमकविण्याचे काम करीत आहे. काही भाग प्रत्यक्ष घरी जाऊन धमकावन्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत. येथून पुढे अशा प्रकारच्या तक्रारी कर्जदाराकडून आल्यास शिवसेना खाजगी फायन्सास कंपनी विरुद्ध शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या पुढे अशा समस्या, अडचणी आल्यास शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांना संपर्क करावा. वेळपडल्यास सक्तीने कर्ज वसूल करणाऱ्या फायन्सास कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख संपर्क नंबर – ७९७२३२९०९९
यावेळी, किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख, निलेश पाटील, बंडू सोनार, जितेंद्र पेढांरकर, वैभव राजपूत,अण्णा चौधरी,नितीन पाटील,दीपक पाटील, विजय भोई, जय बारवकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.