जळगाव (प्रतिनिधी ) ;- माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफत अजून अनिस मर्चंट वय २५ हिचे डिसेंबर २०१८ रोजी लग्न झाले होते . सुरुवातीला सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली मात्र दोन लाख रुपयांसाठी पती अनिस मर्चंट आणि सासू फिरोजा हसन अली धनानी रा. सुरत यांनी छळ केल्याप्रकणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संजय धनगर करीत आहे.