नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-;- गेल्या 24 तासात भारतात सगळ्यात जास्त 52,123 नवे रुग्ण आढळले असून 775 नागरिकांचा मृत्य झाला आहे. भारतात कोरोनाचे 15,83,792 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,28,242 झाली आहे. 10,20,582 नागरिक बरे झाले आहेत देशात मृतांचा आकडा 34,968 वर पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.








