जळगाव (प्रतिनिधी) :- येथील सिंधी कॉलनी येथे आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन भाविकांना वर्सी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याठिकाणी बाबा गोदडीवाले आणि संतांचे दर्शन घेऊन जळगाववासीयांसाठी उत्तम आरोग्याची प्रार्थना केली.
सिंधी कॉलनी येथे वर्सी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी उपस्थिती देऊन दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध राज्यातून आलेल्या भाविकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. समवेत माजी आ.गुरुमुख जगवानी, प्रकाश बालानी, रमेश मतानी, मनोज आहुजा व समाजबांधव उपस्थित होते.