‘मविआ’चे दिलीप खोडपे सुमारे २६ हजार ८८५ मतांनी पराभूत
जामनेर (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. गिरीश महाजन यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे यांचा जवळपास २६ हजारानी पराभव केल्याचे दिसून येत आहे. तसेच, सलग ७ वेळा निवडून येण्याचा मान मिळवून जळगावचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी त्यांनी साधली आहे.
आता २५ फेऱ्या संपलेल्या आहे. गिरीश महाजन यांना २५ व्या फेरीअखेर १ लाख २८ हजार ६६७ तर दिलीप खोडपे यांना १ लाख १ हजार ७८२ मते मिळाली आहे. जामनेर तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जामनेर मतदारसंघात आता चित्र स्पष्ट झाल्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शुकशुकाट दिसून येत आहे.