पाचोरा शहरातील जनसेवक बंडू सोनार यांचा उपक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथील जनसेवक म्हणून ओळखले जाणारे रहिवासी बंडू केशव सोनार व त्यांच्या धर्मपत्नी शितल बंडू सोनार यांच्या वतीने मकरसंक्रांतीच्या सणांचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ८ येथील महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर खेळ पाच पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नगरसेविका सुनिताताई किशोर पाटील व नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी यांच्या उपस्थितीत पाचोरा, भडगाव मतदारसंघाचे हॅट्ट्रिक करणारे आमदार किशोर पाटील यांचा नागरिकांकडून भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. या ठिकाणी आयोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत पुष्पा संदीप पाटील, सोनाली रविंद्र पाटील, प्रियंका तेजस पाटील, स्मिता तुषार पाटील व दीक्षा सागर सपकाळे या विजयी ठरल्या. या विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रभाव क्रमांक आठ येथील जेष्ठ, श्रेष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.