जळगाव (प्रतिनिधी) –कजगाव-जळगाव येथे शिक्षक भारती,राष्ट्र सेवा दल,छात्र भारती व लोकसंघर्ष मोर्चा यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.सदरप्रसंगी शिक्षक भारतीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आहे.सदर कार्यक्रम मुंबई येथील शिक्षक भारतीचे आ.कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जळगाव शिष्टमंडळाने आ.कपिल पाटील यांची भेट घेऊन जुनी पेन्शन विषयावर चर्चा केली.शिष्टमंडळात राज्य प्रसिध्दी प्रमुख संजय सोनार कळवाडीकर,जिल्हा संघटक विपिन पाटील,जिल्हा सल्लागार नाना पाटील आदी उपस्थित होते.संजय सोनार कळवाडीकर यांनी आ.कपिल पाटील यांना जुनी पेन्शन हा मुद्दा तुम्ही सोडवावा अशी विनंती करुन तुम्ही वस्ती शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न जसा मार्गी लावला.तसा जुनी पेन्शनचा प्रश्न ही मार्गी लावावा.जुनी पेन्शन बाबत सांगतांना आ.कपिल पाटील म्हणाले की हा मुद्दा मी हातात घेतला असुन आजवर तुमच्या संघटनच्या मार्फत झालेल्या प्रत्येक आंदोलनास मी उपस्थित राहुन सक्रिय पाठिंबा दिला असुन तुमच्या संघटनचे राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे यांच्याशी याबाबतीत सविस्तर चर्चा झालेली आहे.असे सांगुन जुनी पेन्शन लागु करण्या संदर्भात प्रयत्न करणार आहे.सदर भेटीसाठी शिक्षक भारतीचे जळगाव जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.








