गावागावात जल्लोष सुरु
जामनेर (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. गिरीश महाजन यांनी जवळजवळ विजय निश्चित केला आहे. महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे हे जवळपास २५ हजारानी पिछाडीवर दिसून येत आहे.
आता जवळपास २१ फेऱ्या संपलेल्या आहे. गिरीश महाजन यांना १ लाख ११ हजार ९७० तर दिलीप खोडपे यांना ८६ हजार ७५३ मते मिळाली आहे. जामनेर तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जामनेर मतदारसंघात आता चित्र स्पष्ट झाल्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शुकशुकाट दिसून येत आहे.