जळगांव ( प्रतिनिधी ) – शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात ठेक्याच्या कारणावरून एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर पाटील यास मारहाण करून वाहनाची मोडतोड करणारा राहुल सोनवणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा .दाखल करण्यात आला आहे.


समीर पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्यांचे ठेकेदार मित्र सचिन सनेर यांनी दाखल केलेली रस्त्याच्या एका कामाची निविदा आज उघडली जाणार होती . सचिन सनेर बाहेरगावी गेलेले असल्याने या निविदेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात जळगावला आलेले होते . या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांची कार ( क्र एम एच १९ – बीयू ३३०० ) राहुल शांताराम सोनवणे आणि त्याच्या जवळपास ८ साथीदारांनी अडवून त्यांना शिवीगाळ करीत आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली यावेळी समीर पाटील यांच्या सोबत त्यांचा कारचालक होता या लोकांनीं त्यांच्या कारची समोरची मोठी काच दगड मारून फोडली मात्र प्रसंगावधान राखत समीर पाटील चालकासह तेथून कार घेऊन निघून गेले त्यानंतर राहुल सोनवणे याने सचिन सोनेरी यांनाही फोन करून शिवीगाळ करीत धमक्या दिल्या याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबंधित लोकांविरोधात भा द वि कलम १४३ , १४७ , ३४१, ४२७, ५०६ , ५०७ , ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि प्रदीप चांदेलकर करीत आहेत.







