जळगाव ;- शिवाजीनगर प्रभागामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला असून धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेेचे आरोग्य तपासणी सर्वेक्षण सुरू आहे, ते काम सुरू असतानाच अजून आम्हाला भुरे मामलेदार प्लॉट व काळे नगर परिसरात डेंग्यूचे,मलेरियाचे रुग्ण सुद्धा आढळून आलेले आहे तेव्हा या पार्श्वभूमीवर धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने आरोग्य विभागास येथील संपूर्ण परिसरात धूर फवारणी करून याकामी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी निवेदन देताना धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील आणि प्रकाश मुळीक धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देऊन आहे की लवकरात लवकर शिवाजी नगर भागात डेंग्यू व मलेरियाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर धूर व औषध फवारणी करून निर्जंतुक करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.