जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली ते उमाळा दरम्यान रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली होती. या अपघातात अजय देविदास पवार (वय-२५ रा.चिंचोली) हा तरुण गंभीर जखमी झाला असल्याने त्याने आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कार क्रमांक (एमएच.१२ जे.यु.८७७०) यांच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.







