मुंबई ;- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर जा.
त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.







