जळगाव — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सोबत डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी), डॉ. हेमंत इंगळे (प्रभारी प्राचार्य), सौ.नीलिमा चौधरी (प्रिन्सीपल गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव), डॉ. ईश्वर जाधव(रजिस्ट्रार), प्रा. एन. जी. चौधरी तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्या संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिस्तीत पथसंचलन केले गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन, तसेच रोटरॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले व कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने झाला.