जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गेंदालाल मिल परिसरात जुन्या वादातून एका रिक्षाचालक तरुणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी दि. २३ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन जगन्नाथ शिंपी (वय-३२, रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण रिक्षा चालविण्याचे काम करून उदरनिर्वाह करतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी दि. २३ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता याच परिसरात राहणारा अमीर रहीम खान (वय ३२) याने शिवीगाळ करून त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या सचिन शिंपी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता संशयित आरोपी अमीर रहीम खान याच्याविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहे.