तालुक्यातील अनुयायांची उपस्थिती
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या आदिवासी परिसरात अध्यात्मिक गंगेचे भगीरथ श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या नावाने दि. २३ जानेवारी रोजी रावेर येथील सावदा रोडवरील चौफुलीला पूज्य बापूजी यांचे नामकरण व रावेरचे आ. अमोल जावळे यांच्या हस्ते वार्ताफलकाचे उदघाटन करण्यात आले.
या वेळी आ. अमोल जावळे यांनी मनोगत व्यक्त करतांनासांगितले की, परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी रावेर तालुक्याचे वैभवशाली महापुरुष असून, आपल्याला अभिमान आहे. ज्यांनी सातपुड्यातील अज्ञान व अंधश्रद्धेच्या अंधःकारात भरकटलेल्या आदिवासी बांधवांसह देशभरातील लाखो भक्तांचे आध्यत्मिक जीवन उंचावून भक्तीच्या मार्गात आणून दिले आहे. अशा महापुरुषाचे गुणगान होणे गरजेचे असून, असे कार्य आपण करीतच राहायला पाहिजे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी पूज्य बापूजीचे जीवन चरित्र सांगितले. या परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चौकाचे ठराव चैतन्य साधक परिवाराकडून रावेर नगर पालिकेला देण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिति दर्शविली होती .