बोदवड (प्रतिनीधी) – संचारबंदीच्या काळात सुरुवातीला साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दीच्या ठिकाणांना बंदी घातल्याने मद्य विक्री दुकाने बंद होती.परंतू दारुची चोरट्या पद्धतीने जास्त दरात विक्री केली जात होती.या प्रकारात जिल्हाधिकार्यांच्या नियमांचे सरार्स उल्लंघन करुन मद्य विक्री करणे जिल्ह्यातील वाईन शॉपी परवानधारकांना चांगलेच महागात पडले असून दिनांक २८ रोजी परत शहरातील एका वाईन शॉपचा परवाना रद्द झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून गर्दीच्या ठिकाणांवर साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्बंध लादण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर ; जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकानांना ३ मे पर्यंत बंदचे आदेश जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आले होते.परंतू,काही मद्य परवानाधारकांकडून नियम धाब्यावर बसवत दारुची तिप्पट दराने विक्री करणे सुरु होते. या संदर्भातील तक्रारी आमदार चंद्रकांत पाटिल यांना येताच त्यांनी राज्य जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षक यांना याबाबत कळविताचं दिनांक ३१ मार्च रोजी बोदवड शहरातील मद्य विक्री दुकाने सिल करण्यात आली होती.
यानंतरमद्यविक्रीस शासनाकडून परवानगी देण्यात आल्यावर सिल लावलेल्या दूकानांची स्टॉक तपासणी दिनांक ५ मे रोजी उत्पादन शुल्क विभागा कडून करण्यात आली होती. यात बोदवड शहरातील मनोज वाईन शॉपच्या दि.५ मे रोजीच्या स्टॉक तपासणीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने परवाना रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आली.संचारबंदीच्या काळात तिप्पट दराने मद्य विकणे संबंधित परवानधारकास चांगलेच महागात पडले असून परवाना रद्द झाल्याच्या वृत्ताने तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, संबंधित परवानाधारकाने मद्य दुकान विनापरवानगी उघडले , एफएलआर ३ नोंदवही,सिएल २२ नोंदवही व ब्रँडवाईज नोंदवही दिनांक १९ /०३/२०२० पर्यंत नोंदविलेले आढळून आले तर दि. २०/०३/२०२० व २१/०३/२०२० च्या नोंदी घेतलेल्या नसल्याचे उघडकीस आले.एकूण ६ परिवहन पासेसच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेतलेल्या नाहीत.या प्रकारात साठ्याच्या तूलनेत विदेशी मद्याच्या विविध क्षमतेच्या 5479 बाटल्या देशी मद्याच्या 10994, बिअरच्या1428,वाईनच्या 12 बाटल्या कमी आढळलेल्या आहेत.त्यामूळे महाराष्ट्र देशी दारु नियम 1973,सीएलएफएलटीओडी ३ अनुज्ञप्ती शर्त क्रमांक ८,महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या ई.) नियम 1969 चे नियम 15(1) चे उल्लंघन झालेले आहे.
महाराष्ट्र देशी मद्य नियम, सीएलएफएलटीओडी – ३ शर्ती , महाराष्ट्र विदेशी दारू रोखीने विक्री रजिस्टर इत्यादी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवानाधारकाविरोधात गून्हा नोंदवून आरोप पत्र क्रमांक २१ उपस्थित प्रतिनिधी नारायण पाटिल यांना दिनांक ५/५/२०२० रोजी जागीच बजावून त्यांचा जाब नोंदवून सदरील कारवाई पंचासमक्ष करण्यात आल्याने रितसर पंचनामा करण्यात आलेला असून मुळ जवाब सादर करुन पूढील कार्यवाहीस्तव निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क , भरारी पथक,जळगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केल्यानंतर सदरची कार्यवाही करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना सदर परवानाधारक यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाच्या अटी व शर्तीचे भंग केल्याने(कोव्हिड 19 )देशव्यापी लॉकडाऊन कालावधीमध्ये बेकायदेशीर मद्य विक्री केल्याचे स्पष्ट होत असल्याने शहरातील मे.मनोज वाईन,एफएल – २ अनुज्ञप्ती क्रमांक ३३ व सीएलएफएलटीओडी – ३ क्रमांक २३ चा परवाना निलंबित करण्यात आला आहे.