मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा शिवारातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भोटा शिवारात विहिरीत पडल्याने एका बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २२ रोजी गट क्रमांक ८१ मधील तुळशीराम मोरे यांच्या शेतातील विहिरीत घडली. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल व कर्मचारी दाखल झाले व त्यांनी मृतावस्थेतील बिबट्याला बाहेर काढत कुऱ्हा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. अंदाजे साडेतीन वर्ष वयाच्या बिबट्यावर सहाय्यक वनसंरक्षक यु.एस. बिराजदार, वढोदा वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे, पशू वैद्यकीय अधिकारी मनोज प्रल्हाद पाटील, डॉ. कपावर महेश्वर, कृष्णा रेड्डी, डॉ. प्रशांत लोंढे, ए.एस.मोरे, स्वप्नील गोसावी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.