मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या घटनांबाबत मंत्री परिषदेत चर्चा झाली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. सकृतदर्शनी हे प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत देण्यात आली. यावर अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क राहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच अशाच प्रकारच्या घटना वर्धा येथे आढळून येत असून त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.