पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शेतात पिकास पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही संक्रांतीच्या दिवशीच तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दीपक वाळके (४२, डोंगरगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी दि. १४ रोजी ते शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का लागला. ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. डोंगरगावात शोककळा पसरली आहे.