विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा बु. येथील डी. आर.चौधरी विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक सायरा खान यांच्या अध्यक्षतेखाली रेणुकाई महिला सार्वजनिक वाचनालय आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी लीलाधर हरचंद भंगाळे होते.
लीलाधर भंगाळे यांनी सरस्वती पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी देण्यात आले व त्या पुस्तकांचे जीवनातील महत्त्व किती असते यासंदर्भात निबंध लिहून घेत. विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक रोख स्वरूपात देण्यात आले. यावेळी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालक, वाचनालयाचे ग्रंथपाल व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित होण्यास मदत होते. यामुळे संस्कारीत विद्यार्थी घडतो असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गिरडे यांनी व आभार श्रीमती नेमाडे यांनी व्यक्त केले.