जळगाव (प्रतिनिधी) :- पुणे येथे झालेल्या सेक्सोलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेत डॉ प्रभु व्यास यांना इंस्पायरींग सेक्सोलॉजीस्ट अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले .
डॉ प्रभु व्यास यांनी सेक्सोलॉजी विषयात पीएचडी अहमदाबाद येथून केली आहे.
सेक्सोलॉजी चे राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डी हार्टमॅन (अमेरिका), मुंबईचे सॅक्सोलॉजीस्ट डॉ प्रकाश कोठारी ,नानावटी सुपर स्पेशालीटी चे डॉ राज ब्रह्मभट, चेन्नई अपोलो हॉस्पिटलचे सॅक्सोलॉजिस्ट डॉ. नारायण रेड्डी ,हैद्राबादचे सॅक्सोलॉजिस्ट राष्ट्रीय अध्यक्ष जी व्यंकटरमना यांनी ट्रॉफी, सर्टीफिकिट, पुणेरी पगडी व शाल, मेडल देऊन सत्कार करून अभिनंदन केले. हा कार्यक्रम पुणे येथील सुप्रसिद्ध हिंदु जिमखाना डेक्कन येथे झाला.
फॅक्टर ॲक्सीलरेटिंग अँड डीप्रेसिंग पिनाईल इरेक्शन अँड प्रिमॅच्युअर इजाक्यूलेशन हा त्यांचा रिसर्च व संशोधनचा विषय होता. त्यांनी अनेक नॅशनल व इंटरनॅशनल सेक्सोलॉजी मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व रिसर्च पेपर सादर केले. सेक्सोलॉजी ,सुखी वैवाहिक जीवन, संततीप्राप्ती हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांनी स्वतः १२६ वेळा रक्तदान केले.