ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील घटना, १४ जखमी
जळगाव (प्रतिनिधी) :- मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आज बुधवारी दि. १५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांच्या अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातील दाम्पत्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. अपघाताप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु आहे.
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टेम्पोचे टायर ब्लर झाल्याने बॅलन्स जाऊन लेनमध्ये घुसला. त्याच वेळी नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला एका कंटेनरने दिलेल्या जबर धडकेत बस पलटी झाली. यात अमळनेर तालुक्यातील दाम्पत्य व चोपडा येथील एक प्रवासी असे ३ जण मृत्यूमुखी पडले आहे. तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच ग्रामस्थ्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.
मृतांमध्ये अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पियुष पाटील (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी वृंदा पियुष पाटील (वय ३२) यांचा समावेश आहे. तर त्यांची अडीच वर्षीय मुलगी हि गंभीर जखमी आहे. पियुष व वृंदा हे मकर संक्रांतीनिमित्त घरी आले होते व रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईकडे परत निघाले होते. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा या माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. तसेच या अपघातात जखमींमध्ये चोपडा येथील एकाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींमध्ये अदान खान (वय २८, रा. धुळे), समीना सय्यद (वय ३५, रा. कल्याण), माया कटरे (वय ५५, रा. कल्याण ), साई सागर यदिंगे (वय ३, रा. कल्याण), महेंद्र यदिंगे (वय ५२, रा. कल्याण), परि सागर यदिंगे (वय ५, रा. कल्याण), रेहमान इमदादूर (वय ३२, रा. आसाम), शिफा सय्यद( वय ३४, रा. कल्याण) सैय्यद शरिक (वय ३८, रा. कल्याण), अरुणाबाई पाटील (वय ४०, रा. कल्याण ), देविदास बैसाने(वय ५२, रा. अमळनेर), अनिल गुप्ता (वय ३२, रा. नागपूर), किशोर कुमार पाटील (वय ५० , रा. अमळनेर), मुकेश बैसाणे (वय ४५, रा. चोपडा), ज्ञानेश्वर वानखेडे(वय ४७, रा. बोरशेटी), जय लक्ष्मी शेट्टी (वय २०, कांदिवली) यांचा समावेश आहे.