चोपडा तालुक्यातील विटनेर येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील विटनेर गावात असलेल्या मंदिरातील ५१ किलोचा पितळी घंटा, ५ किलोचा पितळी घंटा, चांदीचे दागिने तसेच दानपेटीतील रोकड असा ६० हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीच्या तपासासाठी जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक चोरट्यां चा माग काढू शकले नाही.
दरम्यान मंदिरातील चोरीच्या घटनेने विटनेर सह परिसरात खडबळ उडाली आहे. विटनेर येथील श्रावण बाबा मंदिरात असलेला ५१ किलोचा पितळी घंटा, दुसरा ५ किलोचा पितळी घंटा, १० हजार रुपये किंमतीचा २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा करदोडा, दोन हजार रुपये किंमतीचे १२५ ग्रॅम वजनाचे दागिने तसेच दान पेटीतील २५ हजार रूपये रोख असा ५९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दि.११ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून तर दि. १२ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जळगावहून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मंदिरा पासून शेजारी असलेल्या शेतांच्या पलीकडील नाल्यापर्यंतच माग दाखवला.
यावेळी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून ठस्यांचे नमुने घेतले. याबाबत श्रावण बाबा मंदिराचे पुजारी पुंजू देवसिंग कोळी (वय-६१, रा. विटनेर) यांच्या फिर्यादीवरून आज्ञात ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू महाजन हे करीत आहेत.
[13:35, 14/01/2025] विश्वजित लोकसत्ता: वाघळी येथे गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त