भुसावळ शहरात पुन्हा थरार, पोलिसांकडून तपासाला सुरुवात
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील खडका रोडनजीक अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात खून झाल्याची घटना समोर आली आहे. हा खून पुर्ववैमन्यस्यातून झाल्याची माहिती मिळत आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.
तहरीन नजीर शेख (वय ३०) असे मृताचे नाव आहे. भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील तो प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. दरम्यान शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे चहा घेण्यासाठी आला होता. यावेळी संशयित चार ते पाच संशयित आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या.
यानंतर तहरीन याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झालेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज शोधणे तसेच संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान पुन्हा खून झाल्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.