उपयुक्त माहितीसह, दिनदर्शिकेच्या सजावटीचे अशोकभाऊंसह मान्यवरांनी केले कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) :- अगदी कमी कालावधीत वाचकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणार्या साप्ताहिक केसरीराजने अत्यंत उपयुक्त माहिती, तिथी, आणि उत्कृष्ट सजावटीसह २०२५ दिनदर्शीका प्रकाशीत केली आहे. या दिनदर्शीकेचे उद्योगपती तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिनदर्शीकेच्या सजावटीसह यात असलेल्या उपयुक्त माहितीचे अशोक भाऊंनी कौतुक केले.
चौफेर लोकप्रियता आणि वाचकांचा विश्वास दिवसेंदिवस सार्थ ठरवताना जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली ही वाटचाल सर्वसमावेशकतेने पुढेही समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणारी ठरो, अशी उमेदीला बळ देणारी शाबासकी यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दिली. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ‘केसरीराज’चे संपादक भगवान सोनार, जैन इरिगेशनचे माध्यम प्रमुख अनिल जोशी हे उपस्थित होते.
साप्ताहिक केसरीराज गेल्या. मागील सहा वर्षांपासून उत्तमोत्तम दिनदर्शीका प्रकाशीत करीत आहे. सर्वसामान्य वाचकांना भावेल अशा उत्कृष्ट सजावटीसह सर्व सण, तिथी यांच्या उपयुक्त माहिती या दिनदर्शीकेत समाविष्ट आहे. निर्भिड वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांच्या मनात साप्ताहिक केसरीराज, यु ट्यूब चॅनेल व केसरीराज ऑनलाईन पोर्टलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट दिनदर्शीका प्रकाशीत करण्याचा संकल्प साप्ताहिक केसरीराजने यंदाही मोठ्या उत्साहात साकारला आहे.
मान्यवरांनी केले कौतुक
दिनदर्शिकेचे डॉ. रोहन पाटील, डॉ. निलेश किनगे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. अमोल पाटील, डॉ. अमित भंगाळे, डॉ. मनीष चौधरी, डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. जगमोहन छाबडा यांनी देखील दिनदर्शिकेच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.