शिरसोली ( वार्ताहर ) – येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, चंद्रकांत कुमावत, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, देवका पाटील हे मंचावर उपस्थित होते. प्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींना बालिका दिनाच्या निमित्ताने गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील भदाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकाश टाकला. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन नेत्रा वाणी यांनी केले. आभार घनश्याम काळे यांनी मानले.