शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध हिवाळी क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात आला आहे. सदर हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विद्यमान संचालक व शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे यांच्या हस्ते मैदानावरती पूजा करून व नारळ फोडून करण्यात आले.
त्यानंतर स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले .सोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, क्रीडा शिक्षक संजय काटोले, उच्च माध्यमिक विद्यालयाचे मनोज बारी, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, चंद्रकांत कुमावत, सुनील ताडे आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.