

शिरसोली (प्रतिनिधी):- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची चार दिवसीय हिवाळी शैक्षणिक सहल विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, अशोक बावस्कर, भरत भारी, नंदा अकोले, भारती ठाकरे, किरण कोळी, वसंत भारुडे यांच्यासोबत रांजणगाव, थेऊर, मोरगाव, जेजुरी, सासवड, प्रति बालाजी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड ,रायगड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, पाली, महड, लोणावळा, कार्ले लेणी, प्रति शिर्डी, चाकण, शिक्रापूर या ठिकाणी गेली आहे.
सहलीला संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार ,शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर तांदळे, शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी परिवहन मंडळाच्या बसची विधिवत पूजा करून व नारळ वाढवून सहलीला हिरवा झेंडा दाखवला. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांना सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, दीपक कुलकर्णी, सुनील ताडे, घनश्याम काळे, ललित पाटील उपस्थित होते.









