वासुदेव जोशी समाज सेवा संघ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
जळगाव (प्रतिनिधी ) – सालाबाद प्रमाणे श्री गुरु गोरक्षनाथजी मंदिराचा १ जानेवारी रोजी वर्धापन दिवस साजरा केला जातो. या वर्षी हि वासुदेव जोशी कॉलनीतील श्री गुरु गोरक्षनाथ मंदिराच्या रौप्य महोत्सवी संगीतमय श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताह आयोजन केलेले असून १ जानेवारी रोजी कथेच्या सातव्या दिवशी भागवत ग्रंथाचे भव्य मिरवणूक आणि ग्रंथ पुजन करण्यात आले.
या सात दिवसीय संगीतमय श्री भगवत कथा प्रवक्ता श्री कृष्ण प्रेमी ह.भ.प.मनोजचंद्र महाराज श्री धाम वृंदावन यांच्या श्री मुखातुन झाली आणि गुरवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता समारोप होता. प्रसंगी परिसरातील अनेक भावी भक्त पुरुष महिला वर्ग,तरुण, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री क्षेत्र गाळने येथील महंत माधव नाथ व साधु संत उपस्थित होते.
या प्रसंगी वासुदेव जोशी समाजाचे राष्ट्रिय अध्यक्ष रमेश श्रीखंडे,समाजाचे अध्यक्ष सदाशिव वेडु जोशी उपाध्यक्ष किरण प्रल्हाद जोशी, कार्याध्यक्ष आनंदा फकीरा जोशी, सचिव अनिल गुलाब पवार खजिनदार सुनील प्रभाकर कानडे सहखजिनदार किशोर देविदास विधाते, सहसचिव रविंद्र भाऊराव रणदिवे व संघटक प्रमोद वसंत पोळ या पंच मंडळी मान्यवरांच्या हस्ते वासुदेव जोशी समाज सेवा संघ दिनदर्शिकेचे थाटाने विमोचन करण्यात आले.