जळगाव एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलींडरमधून वाहनामध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ११ गॅस सिलीडरसह गॅस रिफिलींगचे साहीत्य जप्त करण्यात आले. ४ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलॉग सेंटवर वाहनात गॅस भरतांना सिलींडरचा स्फोट होवून सात जण मृत्यूमुखी पडल्याची घटना पडली होती. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी शहरातील अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस रिफिलींग सेंटवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पिंप्राळा परिसरात वाहनांमध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गॅस रिफिलींग सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये ११ घरगुती गॅस सिलीडर, पाच गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या मोटारी, दोन वजन काटे असा एकूण २ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वसीम चंगा शहा (रा. ख्वाजा नगर, पिंप्राळा), फिरोज अलाउदीन शेख (रा. पिंप्राळा हुडको), जुबेर खान उस्मान खान पठाण (रा. पिंप्राळा हुडको), अकलाख खान जहाँगीर खान (रा.ख्वॉजा नगर) यांच्याविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव रवींद्र कापडणे, भरत पाटील यांच्यासह रामानंद नगरचे जितेंद्र राठोड, इरफान मलिक यांच्या पथकाने केली.