रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत व कृषीकन्या यांच्या वतीने राष्ट्रीय किसान दिन सप्ताहनिमित्त सिंचन प्रणालीवर प्रशिक्षणाचे निंभोरा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सिंचन प्रणालीवर प्रशिक्षण देण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील खिर्डी गावातील कृषिदूत कुणाल लेंडवे, समर्थ नवले, जयप्रकाश सातपुते, शिवशंकर यंकंची आणि निंभोरा गावातील कृषीकन्या शिवनेरी माने, आचल राजरवाल, सपना राठोड, विजया वराडे (रावे रब्बी) यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील व संबंधित विषयातील प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन प्रणालीवर प्रशिक्षण आयोजनाचे माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवनेरी माने हिने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश शिवदे यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख म्हणून सिग्नेट कंपनीचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज श्रीवास्तव उपस्थित होते. यावेळी त्यांनी सिंचन पद्धती, त्यावरील उपाय व नियोजन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यासोबत शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासोबत संवाद साधला. कृषीदूत आणि कृषिकन्या यांच्या कडूनही सिंचनाबद्दल शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच केळी पिकाबद्दलही या कार्यक्रमात माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यात आले. गावातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समर्थ नवले यांनी केले तर कार्यक्रमास कृषी महाविद्यालय जळगाव व सिग्नेट कंपनी तसेच गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.