मंगळवारी मेहंदी, रांगोळी स्पर्धेमध्ये येणार रंगत
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘क्षितिज’ स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धांना सुरुवात झाली आहे. मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून मुख्य संमेलन हे दि. ३ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
येथील ”क्षितिज” स्नेहसंमेलनानिमित्त गुरुवार दि. २६ डिसेंबरपासून स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली आहे. दि. २६ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील त्यांचे वक्तृत्व उत्स्फूर्तपणे दाखवले. दि. २७ रोजी “ब्लॅक अँड व्हाईट डे” तर दिनांक २८ रोजी “बॉलीवूड डे” साजरा करण्यात आला. सोमवारी दि. ३० डिसेंबर रोजी आनंदमेळा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ मांडले होते. यामध्ये विविध प्रांतांचे खाद्यपदार्थांचा आस्वाद विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी घेतला.
दि. ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे तर दि. ३ रोजी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात नृत्य, नाट्य, गायन आदी कलाप्रकार सादर होणार आहे. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी कलाविष्कार पाहण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी केले आहे.