डॉ. चैतन्य पाटील यांच्या तातडीच्या उपचाराने जिवदान, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मिळवून दिला लाभ
जळगाव — बांधकाम मजूराच्या छातीवर भिंत कोसळून दोन्ही बाजूच्या बरगडयावर गंभीर फ्रॅक्चर झाल्याने अत्यावस्थ अवस्थेत डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दाखल झाला. यावेळी शल्यचिकीत्सा विभागातील तज्ञ डॉ. चैतन्य पाटील यांनी गाभीर्य ओळखून तातडीने यशस्वी उपचार केल्याने रूग्णास जिवदान मिळाले आहे.याबाबत माहिती अशी की अकोला येथील इस्त्राईल शेख या ५५ वर्षीय इसमाच्या छातीवर ाधंकामाच्या ठीकाणी काम करतांना भिंत कोसळली.यामूळे त्यांच्या दोन्ही बाजूच्या बरगडया फॅ्रक्चर झालेल्या होत्या. त्यांना श्वास घ्यायला देखिल त्रास होत होता. एसपीओटू तपासल्यावर जवळपास ५० टक्के पर्यंत खाली आले होते. अशी परिस्थीती अत्यंत धोकादायक असते. उजवीकडील ४ ते ५ तसेच डावीकडील २ ते ३ बरगडया फ्रॅक्चर असल्याचे क्ष किरण तपासणीत आढळून आले. या सर्व परिस्थीतीचे गांभीर्य ओळखत डॉ. पाटील यांनी रूग्णांस ताबडतो कुत्रीम श्वासोश्वास पुरवठा करण्यास सांगितला. व्हेल्टीलेटर्स सपोर्ट लावल्यानंतर दोन्ही ाजूने इंटरकोस्टल ड्रेन ट्यू टाकण्यात आली ज्यामूळे रक्तस्त्राव छातीतून निघून टयुब मध्ये आला त्यामूळे फुफुस्स पसरण्यासाठी जागा मिळाली व श्वासोश्वास सूरळीत होण्याची सूरूवात झाली त्यामूळे एसपीओटू ५० वरून ८० टक्क्यापर्यंत पोहचला. यानंतर रूग्णांस सीपॅप वर घेत २४ तास लक्ष ठेवण्यात आले. याचबरोबर जिवनरक्षक प्रणाली औषधींचा मा—यामूळे क्षकीरण तपासणीत रक्ताच्या गाठी विरघळण्यास सूरूवात झाल्याचे दिसून आले. २४ तासानंतर लगेचच रूग्ण ऑक्सीजनवर आला. स्ट्रेपींग पध्दतीने दोन्ही ाजूच्या बरगडया योग्य जागेवर आणून ठेवण्यात आले.यानंतर ५ व्या दिवशी डाव्याबाजूची टयु काढल्यावर ५ तासानंतर क्ष किरण तपासणी करण्यात आली. पुढील ६ व्या दिवशी उजव्या ाजूने देखिल टयु काढण्यात आली. यानंतर रूग्णांस रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
बरगडया फ्रॅक्चर झाल्यानंतर छातीत रक्तस्त्राव होवून फुुफुस्स क्षतीग्रस्त झाल्याने श्वास घेतला जात नाही. अशातच शरीराच्या मुख्य प्रणालीतील अनेक अवयव यांना ऑक्सीजन न मिळाल्याने क्षती पोहचून रूग्ण अत्यावस्थ होवून कोमामध्ये किंवा मृत पावण्याची शक्यता वाढत जाते. म्हणून रूग्ण वेळेवर तज्ञांकडे आल्यास उपचाराची दिशा लवकरात लवकर ठरवून उपचार सूरू करावे लागतात.डॉ. चैतन्य पाटील,