जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन न्याय देण्याची ग्रामस्थांची मागणी
एरडोल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खर्ची रवंजे शिवारातील वाळू चोरी वाहतूक करणारे हे गिरणा नदी, लमांजन हद्दीतील वाळू ७ ते ८ बोटीद्वारे वाळू बाहेर काढून रात्री जेसीबीच्या सह्याने डंपर व ट्रॅक्टर मध्ये भरली जाते. रवंजे हद्दीत नदीकाठावर असलेल्या शेतात ठिय्ये केलेले आहेत. शेतात रस्ते दिलेले आहे. यामध्ये एरंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक करत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
लमांजन गावातील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व गावातील नागरिक यांनी लमांजन हद्दीतील बोटीचे दोर व बोटीचे सामान जप्त केले. अनेक वेळेस गावातील ग्रामपंचायत यांच्यामार्फत कारवाई केली गेली. परंतु तरीही लमांजन हद्दीतील वाळू एरडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे.
तरी एरंडोल शिवरात प्रशासनाचा धाक व कारवाई होत नसल्यामुळे वाळू चोरी जात आहे. यामध्ये वाळू व्यवसायिकामार्फत लमांजन गावातील नागरिक यांना जीवे मारण्याची धमकी,मारठोक शिवीगाळ वेळोवेळी होत असते. आज दुपारी राजू कोळी याने लमांजन येथील नागरिक यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.