संगीतमय श्रीमद् भागवत कथेत फुगळी खेळून जन्म सोहळा साजरा
जळगाव (प्रतिनिधी) :- वाडवडिलांनी केलेली तपचार्या, त्याग, आत्म समर्पण यामुळे मानवाला यश मिळते. प्रत्येकाने आपली गणीमा आणि अंतकरण स्वच्छ ठेवा म्हणजे तो पुन्हा पुन्हा विजयी होतो, असा संदेश कथा व्यास हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी दिला.
कथेच्या पाचव्या दिवशी रविवारी श्रीराम जन्म आणि कृष्णजन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संगीतमय भागवत कथेला शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी भेट दिली. यावेळी महिला भाविकांनी भजनात तल्लीन होऊन ठेका धरला. तसेच फुगळी खेळून जन्म सोहळा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यश, उपयश विजयाच्या दोन बाजू आहेत. नम्रता मनुष्याला विजयी करते तर द्वेष मानवाचा नाश पावतो. धर्म कार्यात कोणाला अडवू नये, असे सांगत डॉ.गूरुबा यांनी श्रीराम आणि श्री कृष्ण जन्म प्रसंग आपल्या मधुर वाणीतून वर्णन केले.
यावेळी बाळ कृष्णाला वासुदेव आपल्या डोक्यावर घेऊन द्वारकेतून बाहेर काढतो असा जिवंत देखावा यावेळी करण्यात आला होता. हा जन्म हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कथा मंडप केळीच्या झाडांनी फुलांनी सजविण्यात आलेला होता. असे अशा प्रसन्नमय वातावरणाने भाविकांचे पाय धिरावले.
तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावातील मनपा शाळा क्रमांक ३, पांजरापोळ येथे २५ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या पाचव्या दिवशी डॉ.गुरूबा यांच्या वाणीतून श्रोतेभाविक मंत्रमुग्ध झाले.
यांच्या हस्ते झाली महाआरती
कथेनंतर निलेश तायडे, बंटी भारंबे, स्वप्नील चौधरी, उमेश विसपुते, रेडक्रॉस रक्त पेढीच्या उज्वला वर्मा, संदीप चौधरी, शंकर सोनार, योगेश भावसार या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आले. यावेळी श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज दहीहंडी उत्सव, कृष्ण विवाह सोहळा
दररोज कथा दुपारी १ ते ५ या वेळेत होत असून सोमवारी कथेदरम्यान दहीहंडी उत्सव, कृष्ण विवाह सोहळा, सुदामा चरित्र असे विविध कार्यक्रम होणार आहे. कथेची सांगता मिरवणूक काढून होईल आणि नंतर गोपाळ काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे.