नूतन मराठा महाविद्यालयात विद्यापीठ विकास प्रबोधिनी यांच्या वतीने प्राध्यापक प्रबोधिनीचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- यूजीसीचे सचिव डॉ मनीष जोशी यांचे नूतन मराठा महाविद्यालयात विद्यापीठ विकास प्रबोधिनी यांच्या वतीने ‘उच्च शिक्षणाचे बदलते प्रवाह’ या विषयावर विविध महाविद्यालयातील प्राचार्य व विभाग प्रमुख यांना मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
डॉ.मनीष जोशी यांनी विविध महाविद्यालयातील प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक यांना नूतन मराठा महाविद्यालयाच्या डॉ. जगदिशचंद्र बोस हॉल मध्ये मार्गदर्शन केले. व्यासपिठावर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, माजी प्राचार्य प्रा.अनिल राव उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना डॉ.जोशी यांनी, जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायत्तत्तेकडे जाणं भविष्यात योग्य होईल. कारण विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत उच्च दर्जाची व विचारक्षमता खूप मोठी आहे. त्यांना त्या पद्धतीने शिक्षण मिळाल्यास ते विद्यार्थी त्या महाविद्यालयाकडे त्या विद्यापीठात येतील अन्यथा त्यांना जिथे चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळेल त्याकडे जातील. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने, विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अत्यंत उच्च पातळीचा विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेला दिला जाणे जास्त उचित होईल, असेही सांगीतले.
तसेच, प्रामुख्याने मी नूतन मराठा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला रास्त अभिमान आहे असा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. तसेच प्राचार्य, प्राध्यापक यांनी विचारलेल्या शकांचे निरसन केले. त्यात प्रामुख्याने प्राचार्य हे प्रोफेसरच असतात या बाबतचा आदेश लवकरच निघेल असे त्यांनी सांगीतले. तसेच प्राध्यापकांमधून विचारलेल्या प्रश्नांपैकी रिसर्च प्रोजेक्ट, मेजर आणि मायनर विषयाबाबत शंकांचे निरसन केले.
माजी प्राचार्य प्रा.अनिल राव यांनी उच्च शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी तयार असावे असे अध्यक्षीय मनोंगत व्यंक्त केले. सदर कार्याक्रमासाठी प्राचार्य डॉ.व्हि.आर पाटील, माजी प्राचार्य पी.आर.चौधरी, प्राचार्य पी.एस.सोनवणे, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, क.ब.चै.उ.म.वि.चे व्यवस्थापन परीषद सदस्य दिपक पाटील, नितीन झाल्टे, प्राचार्य डॉ.प्रिती अग्रवाल, उपप्राचार्य डॉ.के.बी.पाटील, प्रा.आर.बी.देशमुख, नितीन ठाकुर,अमोल मराठे, धिरज वैष्णव यांनी परीश्रम घेतले.