श्रींजीनी कुलकर्णी (कथक)
खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु. ना. गाडगीळ सन्स लि. प्रायोजित २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे.
इतिहास विषयात ग्रॅज्युएशन केलेली अत्यंत उत्तम अशी कथक नृत्यांगना आहे. वार्षिक वसंतोत्सवात दरवर्षी श्रींजिनी आपली कला सादर करीत असते. आजोबा पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी श्रींजीनी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंत आहे. देश विदेशात आपली कला सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्क, ह्युस्टन, बँकॉक, ऑस्टिन, इत्यादी ठिकाणी रसिकांनी तिला डोक्यावर घेतले आहे. तिने नुकताच एक फ्युजन बँक सुरू केला असून त्यामध्ये अभिजात शास्त्रीय संगीताचा आत्मा तसाच ठेवून सादर केला जातो. या बँड मध्ये सर्व तरुण वादकांचा समावेश असून यात अणुव्रत चटर्जी, एस. स्वामीनाथन, शिखरनाद कुरेशी, ईशानी डे, व आय. डी. राव हे तालवादक आहेत.
नुकताच मुजफ्फर अली यांचा आलेला जानीसार या चित्रपटात तिने विविध डान्स सिक्वेन्स सादर केले आहेत. यामधील नृत्याचे दिग्दर्शन पंडित बिरजू महाराजांनी केले आहे. नृत्या बरोबरच श्रींजीनीने अभिनयातही आपला ठसा उमटवला आहे. बंगाली चित्रपट हर हर ब्योमकेश या पं. विक्रम घोष यांच्या चित्रपटात तिने काम केले आहे. वयाच्या ५ व्या वर्षांपासून श्रींजिनी कथकचे धडे आजोबा पं. बिरजू महाराज यांच्याकडे गिरवू लागली. वयाच्या ८ व्या वर्षी श्रींजिनीने आपला जाहीर कार्यक्रम सादर केला. भारतातील अनेक नामवंत महोत्सवात तिने आपली कला सादर केली आहे यात प्रामुख्याने खजुराहो डान्स फेस्टिवल, कालिदास फेस्टिवल, संकट मोचन समारोह, जशन ए रेखता, ताज महोत्सव, चक्रधर समूह समारोह कथक महोत्सव इ. होत. यावर्षी ती आपल्या बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्य सादर करणार आहे. देश विदेशात श्रींजिनीचे होणारे कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच असते. संत मीराबाई, कृष्ण कथा असे थिमॅटिक कार्यक्रमही ती सादर करते. अशा या चतु:रस्त्र कलावंताला पाहण्याचे व तिचा कथ्यक नृत्यविष्कार पाहण्याची संधी जळगावकरांना मिळते आहे ती बालगंधर्व संगीत महोत्सवामुळेच.
अशा या हरहुन्नरी कलाकाराची नृत्य सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.